PHOTO : ‘द कश्मीर फाइल्स’च्या शूटिंग दरम्यान नैराश्यात गेला होता अभिनेता दर्शन कुमार!

Darshan Kumaar

1/7
चहुबाजूंनी वाहवा मिळवणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या मेहनतीचे जोरदार कौतुक होत आहे. अनुपम खेरपासून ते पल्लवी जोशीपर्यंत या चित्रपटातील प्रत्येक पात्रांचा अभिनय अंगावर शहारे आणणारा आहे.
2/7
या चित्रपटात ‘कृष्णा पंडित’च्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेता दर्शन कुमारच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. अभिनेता दर्शन कुमारने अलीकडेच एका मुलाखतीत ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयीचा त्याचा अनुभव शेअर केला आहे.
3/7
बॉलिवूड लाईफशी बोलताना दर्शन कुमारने त्याला चित्रपटात काम कसे मिळाले आणि त्यांचा अनुभव कसा होता, याबद्दल सांगितले. भूमिका करण्याचा निर्णय कसा घेतला याविषयी सांगताना दर्शन म्हणतो की, 'मला प्रथम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सर आणि पल्लवी मॅडम यांनी खऱ्या पीडितांचा व्हिडीओ दाखवला, जेणेकरून मला गोष्टी समजू शकतील.'
4/7
दर्शनने मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'व्हिडीओमधील लोकांच्या वेदना पाहिल्यानंतर, त्यांचे हे नेहमीच दबून राहिलेले सत्य समोर यावे असे वाटले आणि मी ही भूमिका करण्याचा निर्णय घेतला.'
5/7
दर्शन कुमारने मुलाखतीत सांगितले की, या भूमिकेचा त्याच्यावर इतका भावनिक प्रभाव पडला होता की, तो डिप्रेशनमध्ये गेला. या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने सुमारे दोन आठवडे ध्यानधारणा केली.
6/7
अभिनेता म्हणाला, 'जेव्हा लोक चित्रपट पाहून थिएटरमधून बाहेर पडत होते, तेव्हा ते भावनांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि रडत बाहेर आले, पण मी 40 दिवस ते पात्र जगलो.'
7/7
दर्शन कुमार या मुलाखतीत बोलताना म्हणाला की, हे खूप वेदनादायक होते, आतापर्यंतच्या आयुष्यात त्याने साकारलेल्या सर्व पात्रांपैकी हे सर्वात कठीण पात्र आहे. (Photo : @darshankumaar/IG)
Sponsored Links by Taboola