The Kapil Sharma Show: कोणाचं 35 लाख तर कोणाचं 12 लाख कपिल शर्मा शोच्या कलाकारांचे मानधन जाणून घेऊया!

kapil sharma

1/5
कपिल शर्मा (Kapil Sharma),कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek),भारती सिंह (Bharti Singh),किकू शारदा (Kiku Sharda) हे कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे. 23 एप्रिल 2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात. जाणून घेऊयात, 'द कपिल शर्मा शो' चे हे कलाकार एका एपिसोडचे किती मानधन घेतात.
2/5
किकू शारदा (Kiku Sharda) द कपिल शर्मा शोमध्ये बच्चा यादव ही भूमिका साकारणारा अभिनेता किकू शारदाचा चाहता वर्ग मोठा आहे. रिपोर्टनुसार तो द कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडचे 5 ते 7 लाख मानधन घेतो.
3/5
कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) द कपिल शर्मा शोमधील कृष्णा अभिषेकच्या विनोदांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. कृष्णा वेगवेगळ्या अभिनेत्यांची अॅक्टिंग करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. रिपोर्टनुसार तो द कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 10 ते 12 लाख मानधन घेतो.
4/5
भारती सिंह (Bharti Singh) प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंह द कपिल शर्मा शोमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारते भारती या शोसाठी 10 ते 12 लाख मानधन घेते.
5/5
कपिल शर्मा (Kapil Sharma) द कपिल शर्मा शोचे सूत्रसंचालन कपिल शर्मा करतो. या शोच्या एका एपिसोडसाठी कपिल 30 ते 35 लाख मानधन घेतो.
Sponsored Links by Taboola