Zee Marathi Awards 2021 : मराठीसह बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबत रंगला झी मराठीचा अवॉर्ड सोहळा, 30 ऑक्टोबरला होणार प्रसारण
'झी मराठी अवॉर्ड 2021' प्रेक्षकांना 30 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे अतिशय दिमाखात हा सोहळा पार पडणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांना वेड लावणारा गोविंदा, सुपरहिट चित्रपटांचा सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि मनमोहक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री कतरिना कैफने यंदाच्या झी मराठीच्या गौरव सोहळ्यात हजेरी लावली आहे.
बांदेकर भाऊजी कतरिनाचं स्वागत मराठमोळ्या पद्धतीत करताना दिसून येणार आहेत. तिचा पैठणी देऊन सम्नान करताना दिसतील.
कतरिना आणि रोहित शेट्टी त्यांच्या आगामी सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'झी मराठी अवॉर्ड 2021' मध्ये उपस्थित होते.
यंदाच्या सोहळ्याचे आकर्षण म्हणजे प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांचे कलाकार ग्लॅमरस अंदाजात सज्ज झालेले दिसून येणार आहेत.
प्रत्येक मालिकेचा एक कलर कोड ठेवलेला होता. त्यामुळे कलाकार वेगवेगळ्या पोषाखांत दिसून येणार आहेत आणि सोहळा रंगतदार होणार आहे.
सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, खलनायक कोण ठरले आहेत हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.