PHOTO : उर्मिला कोठारेची पडद्यावरच्या लेकीसोबत खास गट्टी!
Continues below advertisement
Tujhech Mi Geet Gaat Aahe
Continues below advertisement
1/7
स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतील स्वरा आणि वैदेही म्हणजेच अवनी तायवाडे आणि उर्मिला कोठारे यांचे सीन्सही खूप छान रंगत आहेत. पडद्यावरच्या या मायलेकी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या मायलेकी झाल्या आहेत.
2/7
उर्मिला आपल्या लेकीप्रमाणेच म्हणजेच जिजाप्रमाणे स्वराची काळजी घेते. इतक्या लहान वयातही स्वरामध्ये असलेला समजूतदारपणा उर्मिलाला विशेष भावतो. दोघींमधली हीच भन्नाट केमिस्ट्री मालिकेत नवे रंग भरत आहे.
3/7
उर्मिलाची लेक म्हणजेच जिजा देखील बऱ्याचदा 'तुझेच मी गीत गात आहे'च्या सेटवर जात असते.
4/7
सुरुवातीला आपली आई या कोणत्या नव्या मुलीचे लाड करतेय असं जिजाला वाटायचं. पण आता जिजा आणि स्वरामध्येही छान गट्टी जमली आहे. शूटिंगमधून वेळ मिळाला की या दोघींचीही सेटवर धमाल सुरु असते.
5/7
सेटवर अवनी सर्वांचीच लाडकी आहे. मालिकेतली आई म्हणजेच ऊर्मिला कोठारेसोबत तिची छान गट्टी जमून आली आहे. आई-मुलीचे इमोशनल सीन अवनी अगदी सहजरित्या साकारते.
Continues below advertisement
6/7
अवनी तायवाडे ही मूळची नागपूरची. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड आहे. अवनीच्या आईने तिची आवड लक्षात घेऊन तिला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं. दोन हिंदी मालिका आणि एका मराठी सिनेमात अवनीने बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
7/7
गाण्याची आवड असणारी स्वरा ज्या गायकाच्या प्रेमात आहे त्या सुप्रसिद्ध गायक मल्हारची भूमिका साकारत आहे अभिनेता अभिजीत खांडकेकर.
Published at : 16 May 2022 08:44 AM (IST)