PHOTO : रांगडा राणादा अन् सोज्वळ अंजलीबाईंची बातच न्यारी, हटके अंदाजात जोडी दिसतेय भारी!

Feature_Photo_4

1/6
झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतील राणादा आणि अंजलीबाई म्हणजेच, अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांची जोडी. (PHOTO : @akshayaddr/Instagram)
2/6
आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. (PHOTO : @akshayaddr/Instagram)
3/6
काही महिन्यांपूर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी अद्यापही राणादा आणि अंजलीबाईंसाठीचं प्रेक्षकांचं प्रेम कमी झालेलं नाही. (PHOTO : @akshayaddr/Instagram)
4/6
सध्या सोशल मीडियावर ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती आपल्या नव्या फोटोशूटमुळे. (PHOTO : @akshayaddr/Instagram)
5/6
काही दिवसांपूर्वी केलेल्या फोटोशूटमध्ये हे दोघेही हटके अंदाजात दिसून आले. या फोटोत अक्षया सुंदर साडीत तर, हार्दिक जोशी धोतर आणि कुर्ता अशा क्लासी लूकमध्ये दिसून आला. (PHOTO : @akshayaddr/Instagram)
6/6
'राणा दा' च्या भूमिकेमुळं घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर सुरु होत असलेली नवी मालिका 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?' (Tuzhya Majhya Sansarala Aani Kay Hava) यामध्ये हार्दिक मुख्य भूमिकेत झळकणार आहे. (PHOTO : @akshayaddr/Instagram)
Sponsored Links by Taboola