Tu Chal Pudha : अश्विनी तू चाल पुढं! मालिकेत रंगणार 'मिसेस इंडिया 2023 ग्रॅन्ड फिनाले'
'तू चाल पुढं' मालिकेत 'मिसेस इंडिया 2023 ग्रॅन्ड फिनाले पार पडणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'तू चाल पुढं' मालिकेत प्रेक्षकांना आपलीशी वाटणाऱ्या अश्विनीचा ग्लॅमरस प्रवास सुरु झाला आहे.
'मिसेस इंडिया 2023 ग्रॅन्ड फिनाले या स्पर्धेत अश्विनीने भाग घेतला असला तरी तिला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
कुटुंबातील सदस्य, त्यांचे स्वभाव, तिचं घराप्रती कर्तव्य या सर्व गोष्टींची सांगड घालून समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेणाऱ्या अश्विनीचा मिसेस इंडिया 2023 ग्रॅन्ड फिनालेचा प्रवास सुरू झाला आहे.
अश्विनीलाने मोठा पल्ला गाठला असला तरी शिल्पी तिच्या या प्रवासात अडथळे आणणार आहे.
आपल्या मातृभाषेत आपल्या मनातलं बोलण्याची परवानगी अश्विनीला मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दीपा परबने जवळपास 14 वर्षानंतर पुन्हा एकदा 'तू चाल पुढं' या मालिकेच्या माध्यमातून मराठीत कमबॅक केलं आहे.
दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं.
बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
‘तू चाल पुढं’ या मालिकेत दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसत आहे.