Top 10 Marathi Serials : 'आभाळमाया', 'वादळवाट' ते 'जुळून येती रेशीमगाठी'; 'या' 10 मालिकांनी गाजवला छोटा पडदा
Marathi Serials : आभाळमाया, वादळवाट ते जुळून येती रेशीमगाठी अशा अनेक मालिकांनी छोटा पडदा चांगलाच गाजवला आहे.
Top 10 Marathi Serials
1/10
'दामिनी' ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच गाजली होती. या मालिकेत प्रतीक्षा लोणकर मुख्य भूमिकेत होती. अन्नायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या एका स्त्रीची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली होती. या मालिकेचं टायटल ट्रॅकदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.
2/10
'आभाळमाया' ही मालिका सुधा जोशी या शिक्षेकेभोवती फिरते. विनय आपटे यांनी या लोकप्रिय मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या मालिकेत सुकन्या मोने, संजय मोने, अतिशा नाईक, हर्षदा खानविलकर अशी तगडी स्टारकास्ट होती.
3/10
'वादळवाट' ही मराठी मालिकादेखील चांगलीच गाजली होती. या मालिकेत आदिती सारंगधर, अरुण नलावडे, शरद पोंक्षे, सुबोध भावे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.
4/10
'गोट्या' ही मालिका ना. धो. ताम्हनकर यांच्या 'गोट्या' या कादंबरीवर आधारित आहे. या मालिकेत जॉय घाणेकर या बालकलाकाराने गोट्याची भूमिका साकारली होती.
5/10
'चार दिवस सासूचे' या मालिकेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे. या कौटुंबिक मालिकेचं कथानक प्रेक्षकांच्या चांगलचं पसंतीस उतरलं होतं. कित्येक वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती.
6/10
'असंभव' या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सतीश राजवाडो यांनी सांभाळली होती. तर चिन्यम मांडलेकरने लेखन केलं होतं. गूढपणा असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
7/10
'होणार सून मी या घरची' या कौटुंबिक मालिकेत तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर मुख्य भूमिकेत होते. मधुगंधा कुलकर्णीने लिहिलेली ही मालिका चांगलीच गाजली होती.
8/10
'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेत आदित्य देसाई आणि मेघना कुडाळकर केंद्रस्थानी आहेत. मालिकेतील ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
9/10
'जय मल्हार' या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे खंडोबाच्या भूमिकेत दिसला होता. खंडोबाच्या आयुष्यावर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
10/10
'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर होती. मालिकेचं कथानक थोडं वेगळं असल्याने ही मालिका प्रेक्षकांना भावली. मालिकेतील सर्वच पात्रांना लोकप्रियता मिळाली होती.
Published at : 24 Nov 2023 08:33 AM (IST)