In Pics | कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या टीव्ही मालिकांचे कलाकार आणि स्क्रिप्ट बदलल्या
Continues below advertisement
Feature_Photo__(4)
Continues below advertisement
1/6
महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लावली आहे. त्यामुळे चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे चित्रिकरण बंद झाले आहे. अशातच काही टीव्ही मालिकांचे कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या मालिकांचे स्क्रिप्ट बदलण्यात आल्या आहेत किंवा त्यांचे कलाकार बदलण्यात आलेत.
2/6
इंडियन आयडॉलचा होस्ट आदित्य नारायण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या कार्यक्रमात होस्ट म्हणून जय भानुशालीची एन्ट्री झाली. त्यानंतर आता परऋत्विक धनजानीने त्याची जागा घेतली.
3/6
'डान्स दिवाने 3' मध्ये अनेक मोठे कलाकार दिसले होते. या शोचा जज धर्मेश याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची जागा पुनित पाठक आणि शक्ती मोहन यांनी घेतली.
4/6
टीव्ही शो 'अनुपमा' मध्ये काम करणारे अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. या शोची मुख्य नायिका रूपाली गांगुली कोरोनाबाधित सापडल्यानंतर या कार्यक्रमाच्या स्क्रीप्टमध्ये बदल करण्यात आला आहे.
5/6
'तारक मेहता का उलटा चश्मा' या प्रसिध्द कार्यक्रमामध्ये आत्माराम भिडे ही भूमिका निभावणाऱ्या मंदार चंदवाडकर हा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या कार्यक्रमाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात आला आहे.
Continues below advertisement
6/6
'वागले की दुनिया' या कार्यक्रमात काम करणाऱ्या दहा क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आहे. त्यामुळे या शोचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.
Published at : 15 Apr 2021 10:35 AM (IST)