Bigg Boss 15: Salman Khan च्या कार्यक्रमात दिसेल 'उडाण' फेम Vidhi Pandya, इमलीची भूमिका केली होती साकार

विधि पांड्या

1/6
बिग बॉसचे नवे पर्व लवकरच सुरू होणार आहे. पर्वातील काही स्पर्धकांची नावेदेखील समोर आली आहेत. यातील एक नाव म्हणजे विधि पांड्या. विधि उडान मालिकेत इमलीच्या भूमिकेत दिसून आली होती.
2/6
उडाण मालिकेत विधि पांड्या ग्रे शेडमध्ये दिसून आली होती. तिच्या या भूमिकेमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेत ती चकोरच्या बहिनीच्या भूमिकेत दिसून आली होती. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात ती काय रंग दाखवणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
3/6
विधीचा जन्म 7 जून 1996 मध्ये मुंबईत झाला होता. तिने मुंबईतील लॉरेस हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतले तर सोफिया महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विधिने अभिनयक्षेत्रात प्रवास सुरू केला. 2014 मध्ये 'तुम ऐसे ही रहना' या मालिकेतून तिने अभिनयात पदार्पण केले. त्यात तिने किरण महेश्वरीची भूमिका साकारली होती.
4/6
विधि आतापर्यंत उडान, बालिका वधू, एक दूजे के वास्ते, लाल इश्क आणि क्राईम पेट्रोल या मालिकांमध्ये दिसून आली आहे.
5/6
अभिनयाव्यतिरिक्त तिचे नाव चर्चेत आले होते. 2018 मध्ये अशा बातम्या येत होत्या की, विधि उडाण मालिकेचे दिग्दर्शक पवन कुमार यांना डेट करते आहे. त्यानंतर पवन कुमार यांची नोकरीदेखील गेली होती. बिग बॉसचा प्रीमिअर 2 ऑक्टोबरपासून होणार आहे. यंदा कार्यक्रमाची थीम जंगल आहे. त्यामुळे स्पर्धकांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे.
6/6
या कार्यक्रमात तेजस्वी प्रकाश, अफसाना खान, डोनल बिष्ट, प्रतीक सहजपाल, करन कुंद्रा, सिंबा नागपाल, शमिता शेट्टी हे स्पर्धक असू शकतात.
Sponsored Links by Taboola