Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' च्या 'या' स्पर्धकांचं नशीब उजळलं; शोमधून बाहेर पडण्याआधीच मिळाले मोठे प्रोजेक्ट्स
बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टेलिव्हिजन अभिनेता शालिन भानोट बिग बॉसनंतर एकता कपूरच्या फीचर शो 'ब्युटी अँड द बीस्ट'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. शालिनने अभिनेता कुशल टंडनची जागा घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमान खानने अलीकडेच बिग बॉसमध्ये सांगितले की, प्रियांका ही एक परिपूर्ण अभिनेत्री आहे. भाईजानने प्रियांकासाठी खास सरप्राईज ठेवले आहे. एकता कपूरनेही प्रियांकाला भेटल्याची चर्चा होती. या शोनंतर प्रियांका सलमान खान फिल्म्सच्या प्रोडक्शन अंतर्गत बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते, अशी माहिती आहे.
एकता कपूर आणि दिबाकर बॅनर्जी यांचा 'लव्ह सेक्स और धोखा 2' हा चित्रपट निम्रित कौर अहलुवालिया हिला मिळाल्याची बातमी आहे. या चित्रपटाद्वारे निम्रित हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची शक्यता आहे.
शोमधून बाहेर पडल्यानंतर गौतम विग रवी दुबे आणि सरगुन मेहताच्या 'जुनूनियत' या शोमध्ये दिसणार आहे. हा एक म्युझिकल शो असून गौतम एका फंकी रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे.
बिग बॉसची स्पर्धक टीना दत्ता बऱ्याच वेळानंतर डेली सोपमध्ये परतणार आहे. लीपनंतर टीना दुर्गा आणि चारू या शोमध्ये नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.
एकता कपूरने तिच्या नागिन मालिकेच्या पुढील भागासाठी सुंबुल तौकीर खानची निवड केल्याची माहिती आहे. सुंबुल 'नागिन 7' मध्ये दिसणार असे बोलले जात आहे.
शोमधून बाहेर पडल्यानंतर लगेचच अंकित गुप्ताचे नशीबही उघडलं आहे. 'जुनूनियत' या शोमध्ये अभिनेता दिसणार आहे. या शोचा प्रोमोही रिलीज झाला असून अंकित रॉकस्टारच्या भूमिकेत खूपच डॅशिंग दिसत आहे.
शोमधून बाहेर पडताच अब्दू रोजिकने त्याचे 'प्यार' गाणे रिलीज केले असून तो सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातही दिसणार आहे. अब्दू 'बिग ब्रदर यूके' या रिअॅलिटी शोमध्येही दिसणार असल्याच्या बातम्या आहेत.