Bigg Boss 15 Contestant List : यंदा बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटींची मांदियाळी, पाहा स्पर्धकांची यादी

Feature_Photo_3

1/9
'बिग बॉस सीझन 15' (Bigg Boss 15) 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शोमध्ये करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, उमर रियाज, विशाल कोटियन, अकासा सिंह, सिम्बा नागपाल, अफसाना खान, डोनल बिष्ट यांसारखे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. जाणून घेऊया यंदा बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक धुमाकूळ घालणार, याची यादी.
2/9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'स्वारागिनी' फेम तेजस्वी प्रकाश 'बिग बॉस सीझन 15'मध्ये दिसून येणार आहे. यापूर्वी रोहित शेट्टीचा शो 'खतरों के खिलाडी'मध्ये ती दिसून आली होती.
3/9
अभिनेता उमर रियाझ (Umar Riaz) या शोमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे.
4/9
अभिनेता सिम्बा नागपालही यंदा बिग बॉसच्या घरात दिसून येणार आहे.
5/9
अभिनेत्री अकासा सिंहचं नावही बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत आहे.
6/9
पंजाबी सिंगर अफसाना खानही बिगबॉसच्या घरात जाण्यासाठी तयार असल्याचं कळतंय.
7/9
मिळालेल्या माहितीनुसार, 'एक दीवाना था' आणि 'रूप' यांसारख्या शोमध्ये दिसून आलेली अभिनेत्री डोनल विष्ट बिग बॉसमध्ये दिसून येणार आहे.
8/9
अभिनेता करण कुंद्राला बिग बॉस 15 च्या मेकर्सनी अप्रोच केल्याचं बोललं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, करण कुंद्राही बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.
9/9
बिग बॉस 15 साठी विशालचंही नाव समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, विशालही या शोमध्ये सहभागी होणार आहे.
Sponsored Links by Taboola