Tejasswi Prakash : बॉडी शेमिंग करणाऱ्यांबद्दल तेजस्वी म्हणाली..
Tejasswi Prakash : छोट्या पडद्यावरील बिग बॉस-15 (Bigg Boss 15) या शोमुळे अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला (Tejasswi Prakash) विशेष लोकप्रियता मिळाली. (photo:tejasswiprakash/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिग बॉसच्या 15 व्या सिझनची ती विजेती ठरली. सध्या नागिन (Naagin) या मालिकेतून तेजस्वी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (photo:tejasswiprakash/ig)
या मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. (photo:tejasswiprakash/ig)
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तेजस्वीनं बॉडी शेमिंग करणाऱ्यांबद्दल सांगितले. ती म्हणाली, 'केवळ वजन जास्त असणाऱ्यांसाठीच नाही तर अंडर वेट असणाऱ्यांना देखील लोक ट्रोल करत असतात.' (photo:tejasswiprakash/ig)
मुलाखतीमध्ये तेजस्वीनं सांगितलं, 'माझं वजन कमी होते म्हणून लोक ट्रोल करत होते. जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी मिळते किंवा तुम्ही जास्त पैसे कमावता. तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे याबद्दल अनेक लोक सल्ला देत असतात' पुढे तेजस्वीनं सांगितलं,'परफेक्ट दिसण्यासाठी सर्जरी करण्याचा सल्ला देखील अनेक जण देतात. मला वाटतं की सर्जरी करणं हा सोपा पर्याय आहे. कारण यामुळे तुमचे शरीर आणि चेहरा तुम्ही मेंन्टेन करू शकता. मला माझ्या शरीराचा अभिमान वाटतो. हे शरीर जसे आहे तसे मला आवडते कारण ते मला देवानं दिलं आहे. जर लोकांना माझा फिटनेस आवडत नसेल तर मी त्यासाठी काहीही करू शकत नाही. महिलांनी स्वत:वर प्रेम करावे.' (photo:tejasswiprakash/ig)
'खतरों के खिलाडी 10', 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विद कपिल' आणि 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये देखील तेजस्वीनीनं सहभाग घेतला होता. (photo:tejasswiprakash/ig)