PHOTO : दिमाखदार शोभायात्रेने 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2022'ची सुरुवात होणार!
स्टार प्रवाह वाहिनीवर 3 एप्रिलला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2022 पाहायला मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाच्या सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे भव्यदिव्य शोभायात्रा.
उत्सवाच्या रंगात रंगून गेलेल्या या सोहळ्यात मराठी सणांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
मराठी वर्षाची सुरुवात होते ती चैत्राची गुढी उभारुन.
या खास दिवशी मराठी परंपरा मिरवत जल्लोषात निघणाऱ्या शोभायात्रा सर्वांचं लक्ष वेधून घेतात.
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यातही स्टार प्रवाहच्या कलाकारांच्या उत्साहात न्हाऊन निघालेली शोभायात्रा पाहायला मिळेल.
ढोल ताश्यांचा गजर आणि पारंपरिक पोशाखाला आधुनिकतेची जोड देत दिमाखात मिरवणारे कलाकार सोहळ्याची दणक्यात सुरुवात करणार आहेत.
स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे.
स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहामध्ये नुकताच हा रंगारंग सोहळा पार पडला.
स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती.
एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या लोकप्रिय कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये आपण भेटत असतो.
पण स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला