PHOTO : नव्या सीझनचं पहिलं एलिमिनेशन; श्रीजिता डे ‘बिग बॉस 16’मधून आऊट!

वीकेंडच्या एपिसोडमध्ये शेवटी एलिमिनेट झालेल्या सदस्याचे नाव जाहीर करण्यात आले, जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.

Sreejita De

1/8
टीव्ही विश्वातील सर्वात वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) सुरुवातीपासूनच खूप चर्चेत आहे. शोच्या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच नवे धमाके पाहायला मिळत आहेत.
2/8
यातच शनिवारी प्रसारित झालेल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये पुन्हा एकदा मनोरंजनाचा डबल डोस पाहायला मिळाला.
3/8
एकीकडे सलमान खानने शालीन भानोतची जोरदार शाळा घेतली, तर दुसरीकडे या सीझनमधून घरातून बाहेर पडलेल्या पहिल्या सदस्याचे नावही जाहीर करण्यात आले.
4/8
स्पर्धक-अभिनेत्री श्रीजिता (Sreejita De) ‘बिग बॉस 16’च्या घरातून बाहेर गेली आहे.
5/8
नेहमीप्रमाणेच यावेळेसही वीकेंडच्या एपिसोडमध्ये अनेक धमाके आणि गोंधळ पाहायला मिळाला. या एपिसोडच्या शेवटी एलिमिनेट झालेल्या सदस्याचे नाव जाहीर करण्यात आले, जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.
6/8
'बिग बॉस 16' च्या कालच्या एपिसोडमध्ये म्हणजेच ‘शनिवार वीकेंड के वार’मध्ये सलमान खानने एलीमिनेट सदस्याचे नाव जाहीर केले. यावेळी त्याने श्रीजिता डेचे नाव घेतले.
7/8
‘बिग बॉस’च्या घरातील सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक असलेल्या श्रीजिता डेचे नाव जेव्हा सलमानने इव्हिक्शनसाठी घेतले, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.
8/8
मात्र, यापूर्वी गोरीसोबत झालेल्या भांडणामुळे श्रीजिता डेला प्रेक्षकांची कमी मते मिळाली होती आणि त्यामुळेच ती बेघर झाली आहे. यानंतर सलमानने तिला शुभेच्छा देऊन या घरातून निरोप दिला. (Photo :@ sreejita_de/IG)
Sponsored Links by Taboola