Shilpa Shinde : शिल्पा शिंदे प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येणार, या शोमधून करणार पुनरागमन!
अभिनेत्री शिल्पा शिंदे हे टीव्हीवरील प्रसिद्ध नाव आहे. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका केल्या आहेत.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'भाबीजी घर पर हैं' या शोमधील अंगूरी भाभीची व्यक्तिरेखा आजही लोकांच्या मनात जिवंत आहे, मात्र वादांमुळे तिला हा शो मध्येच सोडावा लागला होता. (फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
तुम्हीही शिल्पा शिंदेच्या अभिनयाचे वेडे असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शिल्पा पुन्हा एकदा टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवत आहे.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
शिल्पा शिंदेने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत पुष्टी केली की ती लवकरच टीव्ही शोमध्ये पुनरागमन करणार आहे.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
या नव्या मालिकेत तिचे नाव आहे एसीपी 'नयना माथूर'.शिल्पा शिंदे म्हणाली की तिची भूमिका अप्रतिम आहे आणि यावेळी ती लोकांना वेगळ्या पद्धतीने हसवणार आहे. (फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
तिने 'मॅडम सर' या शोच्या टीमचे आभार मानले आणि सांगितले की, या शोचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
हा शो एक कॉमेडी अॅक्शन टीव्ही मालिका आहे, जी 2020 मध्ये सोनी सबवर सुरू झाली.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
हलकीफुलकी कॉमेडी असलेल्या या शोला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)
यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या समस्या आणि त्यावरील उपाय अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहेत.(फोटो सौजन्य :shilpa_shinde_official/इंस्टाग्राम)