Highest Paid Tv Actress: रुपाली गांगुली ते तेजस्वी प्रकाश; छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मालिकेच्या एका एपिसोडसाठी घेतात एवढे मानधन
छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिकांमधील अभिनेत्रींच्या मानधनाबाबत जाणून घेऊयात....
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनं अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं आहे. ती मालिकेच्या एका एपिसोडचे एक लाख ते 1.5 लाख मानधन घेते.
मालिका कुमकुम भाग्य फेम सृती झा ही टीव्हीची टॉप मोस्ट अभिनेत्री आहे. रिपोर्ट्सनुसार, ती एका एपिसोडसाठी 75,000 रुपये घेते.
'अनुपमा' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अभिनेत्री रूपाली गांगुली या मालिकेच्या एका एपिसोडसाठी जवळपास 3 लाख रुपये घेते.
'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत 'साई'ची भूमिका साकारणाऱ्या आयशा सिंह ही मालिकेच्या एका एपिसोडचे 80,000 रुपये मानधन घेते.
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून आपला ठसा उमटवणारी हिना खानचा चाहता वर्ग मोठा आहे. रिपोर्ट्सनुसार, तेजस्वी एका एपिसोडसाठी सुमारे 2 लाख रुपये घेते.
बिग बॉस-15 मुळे तेजस्वी प्रकाशला विशेष लोकप्रियता मिळाली. तेजस्वी ही नागिन या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
तेजस्वी ही मालिकेच्या एका एपिसोडचे दोन लाख मानधन घेते.