Rohini Ninawe : रोहिणी निनावेंच्या प्रतिभावंत लेखणीची पंचविशी
रोहिणी निनावे
1/6
मराठी-हिंदी मालिकांच्या सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या लेखन प्रवासाला नुकतीच पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने 'चंदेरी लेखणी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
2/6
मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते. यात महेश कोठारे, अशोक पत्कीसह दिग्दर्शक, निर्माते, गायक, अभिनेते, अभिनेत्री उपस्थित होते.
3/6
मराठी भाषेतील पहिली दैनंदिन मालिका 'दामिनी' रोहिणी निनावे यांनी लिहिली आहे. आतापर्यंत त्यांनी 72 मालिकांच्या तब्बल 12 हजारपेक्षा जास्त भागांचे लेखन केले आहे.
4/6
दामिनी, अवंतिका, अवघाची संसार, माझ्या नवऱ्याची बायको, अग्गं बाई सासूबाई, मुलगी झाली हो, अजूनही बरसात आहे अशा गाजलेल्या मराठी मालिका तर कुसुम, संजीवनी, इस प्यार को मै क्या नाम दू, दिल से दिया वचन, प्यार का दर्द है, यहाँ मैं घर घर खेली अशा हिंदी मालिकांचे लेखन केले आहे.
5/6
मालिकेतील कलाकारांनी साकारलेल्या त्यांच्या व्यक्तिरेखा आज देखील त्यांच्या नावावरुनच ओळखल्या जातात. त्या कलाकारांनी 'चंदेरी लेखणी' कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा दिला.
6/6
'चंदेरी लेखणी' कार्यक्रमाच्या निमित्ताने मालिकेत नायिका आणि खलनायिकेच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री एकाच व्यासपीठावर आल्या होत्या.
Published at : 09 Oct 2021 11:22 PM (IST)