Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपा-कार्तिकची लगीनघाई; आज रंगणार मेहंदी सोहळा

'रंग माझा वेगळा' या मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या लग्नाची तयारी पाहायला मिळतेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नुकताच दीपा आणि कार्तिकचा हळदी सोहळा पार पडला. आज दीपाचा मेहंदी सोहळा पार पडणार आहे.

कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत. मधल्या काळात या दोघांमध्ये अनेक हेवेदावे होते.
मात्र, आता सारं काही विसरून हे दोघे पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. त्यामुळे चाहत्यांची देखील उत्सुकता वाढली आहे.
दीपाच्या मेहंदी सोहळ्यासाठी दीपाच्या दोन मुली आणि सारं कुटुंब फारच उत्साही आहे.
अनेक संकटांचा सामना करून दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र आले. त्यामुळे हा लग्नसोहळा खास ठरणार आहे.
हा लग्नसोहळा पाहण्यासाठी चाहतेदेखील फार उत्सुक झाले आहेत.
'रंग माझा वेगळा' या मालिकेत सतत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
कार्तिक-दीपाचा लग्नसोहळा प्रेक्षकांना आजपासून रात्री आठ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.