अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडली, 'ही' अभिनेत्री साकारणार मुक्ताची भूमिका
'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मुक्ता आणि सागरच्या प्रेमाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुक्ताच्या भूमिकेत तेजश्री प्रधान तर सागरच्या भूमिकेत राज हंचनाळे यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका 'ये है मोहेब्बतें' या हिंदी मालिकेचा रिमेक आहे.
मात्र, आता अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडली आहे. मालिका सोडण्यामागचं कारण हे समोर आलेलं नाही.
अभिनेत्री तेजश्री प्रधान मालिका सोडल्यानंतर सोशल इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय, चिअर्स! कधी-कधी तुम्हाला बाहेर पडावे लागते, तुमची किंमत ओळखा आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा, कारण दुसरे कोणीही तुमच्यासाठी ते करणार नाही.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आता मुक्ताची भूमिका अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारणार आहे.
अभिनेत्री स्वरदा ठिगळे हे टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध नाव आहे. तिने हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.
अभिनेत्री स्वरदा ठिगळे 'माझे मन तुझे झाले' आणि 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत झळकल आहे. महाराणी ताराराणींच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
स्वरदा ठिगळेने 'सावित्री देवी कॉलेज' या हिंदी मालिकेतच काम केलं आहे. अलिकडे ती 'प्यार के पापड' या हिंदी मालिकेतून प्रेक्षकाचं मनोरंजन करताना पाहायला मिळाली.
स्वरदा ठिगळे गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकली.
अभिनेत्री स्वरदा ठिगळेच्या नवऱ्याचं नाव सिद्धार्थ राऊत असं आहे.
अभिनेत्री स्वरदा ठिगळेचा पती सिद्धार्थ राऊत इंटिरियर डिझायनर आहे.