PHOTO : ‘कुठेही गेले तरी तुझी आठवण नेहमीच...’, कुणाच्या आठवणीत रमलीये प्राजक्ता माळी?
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून जिचे नाव घेतले जाते, अशी नायिका म्हणजे प्राजक्ता माळी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताला भटकंतीची देखील आवड आहे.
सध्या प्राजक्ता माळी एका चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये आहे. मात्र, परदेशातही असतानाही तिचं हृदय मात्र एका ठिकाणीचं अडकलं आहे.
नुकतेच प्राजक्ताने काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘मैं जहाँ रहूँ..मैं कहीं भी हूँ …तेरी याद साथ है।‘ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
‘गैरसमज नसावा, प्रिय भारताला उद्देशून म्हणतेय..’, असे म्हणत तिने आपल्या कॅप्शनचं स्पष्टीकरण देखील दिले आहे.
अर्थात लंडनमध्ये असतानाही प्राजक्ता आपल्या मायदेशाला अर्थात भारत देशाला खूप मिस करत आहे. (Photo : @prajakta_official/IG)