Milind Gawali: आई कुठे काय करते मालिकेमधील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला...
नुकतीच मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
Milind Gawali
1/8
छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधील अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे अनिरुद्ध ही भूमिका साकारतात.
2/8
अनिरुद्धची मुलगी ईशा ही लवकरच लग्नबंधतान अडकणार आहे. ईशाच्या लग्नाला अनिरुद्धचा विरोध आहे. या मालिकेबाबत नुकतीच मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
3/8
मिलिंद गवळी यांनी आई कुठे काय करते या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला.
4/8
प्रोमोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'एका बापाची व्यथा अनिरुद्ध च्या माध्यमातून मांडली जात आहे. अनिरुद्ध खूप चुकीचा वागतो आहे, एका चांगल्या कार्यात विघ्न आणतो आहे असं सगळ्यांनाच वाटणं साहजिक आहे, पण खरंच विचार केला तर अनिरुद्ध च म्हणणं अगदी बरोबर आहे.'
5/8
पुढे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अनिरुद्ध म्हणतोय जोपर्यंत माझी मुलगी तिच्या पायावर उभी राहत नाही , ती तिचं शिक्षण पूर्ण करत नाही , तिला आयुष्यामध्ये जे करायचं आहे ते स्वप्न ती पूर्ण करत नाही , तोपर्यंत लग्नाच्या बेडीत तिला अडकवायचं नाही. बाप म्हणून त्याला त्याची मुलगी खूप चांगली माहिती आहे, दोन वेळा ती प्रेमात फसली आहे.'
6/8
मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
7/8
मिलिंद गवळी यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात.
8/8
आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध या भूमिकेला विशेष लोकप्रियता मिळाली आहे.
Published at : 21 Apr 2023 06:24 PM (IST)