Daughters's Day 2021: मराठी सिनेसृष्टीतील बाप-लेकीच्या जोड्या, ज्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं
फोटो - संग्रहित
1/5
शुभांगी गोखले आणि मोहन गोखलेंची कन्या सखी गोखलेने फोटोग्राफीचे उच्च शिक्षण घेतले आहे. मोहन गोखलेंच्या निधनानंतर सखीचा सांभाळ तिची आई शुभांगी गोखले यांनी केला आहे. सखीने अभिनेता सुव्रत जोशीसोबत लग्न केला आहे. या दोघी मायलेकींची जोडी मराठी सिनेवर्तुळात सर्वांच्याच आवडीची आहे. मातृदिनी सखीने तिच्या आईसाठी लिहिलेलं पत्र प्रचंड गाजले होते.
2/5
सचिन - सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया हिने 'एकुलती एक' या चित्रपटातून मराठी सिनेविश्वात पर्दापण केले होते. तिला लहानपणापासूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले असले तरी तिने अनेक चित्रपट व वेबमालिकांमधून तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे. श्रिया ही प्रचंड ग्लॅमरस अभिनेत्री आहे.
3/5
गिरीश ओक यांच्याप्रमाणे त्यांची कन्या गिरिजादेखील प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूड व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडचा 'तारे जमीन पर' हा तिचा गाजलेला सिनेमा आहे. तिने अनेक जाहिरातींमधूनदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.तिचे आणि तिच्या मुलाचे फोटो तिच्या चाहत्यांना विशेष आवडतात.
4/5
'दिल दोस्ती दुनियादारी', 'दिल दोस्ती दोबारा' या मालिकांमधून लोकप्रिय झालेली स्वानंदी टिकेकर ही अभिनेता उदय टिकेकरांची मुलगी आहे. स्वानंदीला तिच्या वडिलांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिका जास्त आवडतात. स्वानंदी 'सिंगिंग स्टार' या गायनस्पर्धेतची विजेती ठरली होती. गायनाचा वारसा तिला तिच्या घरातूनच मिळालेता आहे.
5/5
मधुरा वेलणकर-साटम ही अभिनेते प्रदीप वेलणकर यांची कन्या आहे. तिने अभिनेता अभिजीत साटमसोबत लग्न केले आहे. तर अभिनेते शिवाजी साटम हे तिचे सासरे आहेत. तिघांनी मराठी-हिंदी सिनेवर्तुळात आपला दबदबा कायम ठेवला आहे. तसेच तिने अनेक प्रायोगिक नाटकांत देखील काम केले आहे.
Published at : 26 Sep 2021 02:38 PM (IST)