PHOTO : प्राजक्ता माळी झाली ‘केबीसी’च्या हॉट सीटवर विराजमान, राहीबाईंच्या संस्थेला दिला मदतीचा हात!
कोण होणार करोडपती (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे.
KBC Marathi
1/6
'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात प्रसाद ओक (Prasad Oak) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सहभागी झाले होते.
2/6
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते.
3/6
या शनिवारच्या भागात बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे या देखील उपस्थित राहिल्या होतात. त्यांच्या 'कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था, अकोले' या संस्थेला मदत म्हणून महाराष्ट्राचे लाडके अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळले होते.
4/6
त्याचबरोबर सोनी मराठी वाहिनीवरील लाडका कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यातील हास्यवीर गौरव मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने, रसिका वेंगुर्लेकर, चेतना भट हेही उपस्थित होते.
5/6
समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते.
6/6
या भागात गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे अशा पद्धतीने पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. बियाणांच्या बॅंकेची सुरुवात नेमकी कशी झाली इथपासून पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी त्या अनवाणी गेल्या इथपर्यंतचा सगळा प्रवास राहीबाईंनी या भागात सांगितला आहे. (Photo : @ Prajakta Mali/IG)
Published at : 24 Jul 2022 09:21 AM (IST)