Marathi Actress Navratri Special Look : 'या' मराठी अभिनेत्रींचे नवरात्री विशेष फोटोशूट, नेटकऱ्यांची फोटोंवर पसंती

Feature_Photo

1/7
(Sonali Kulkarni)सोनाली कुलकर्णी - अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवरात्रीत घागराचोलीचा पेहराव करत फोटोशूट केले होते. सोनालीने गरबा स्पेशल म्हणत ते फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते.(Photo:@sonalee18588/IG)
2/7
सोनालीचा रंगीत घागरा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होता. तिने फोटोवर 'गरबा स्पेशल' असे कॅप्शन दिले होते. तर व्हिडीओवर "मी या लूकच्या प्रेमात पडले". असे कॅप्शन लिहिले होते. (Photo:@sonalee18588/IG)
3/7
(Sai Lokur) सई लोकुर - सई लोकुरने खास गरबा स्पेशल घागरा घालत फोटोशूट केले होते. तर जोशात दांडिया खेळतानाचा व्हिडीओदेखील शेअर केला होता. (Photo:@sai.lokur/IG)
4/7
(Vanita Kharat) वनिता खरात - प्लस साईज मॉडेल म्हणत वनिता खरातने खास नवरात्री विशेष फोटोशूट केले होते. तिने कॅप्शन लिहिले होते, "तिचा रांगडा देह, निळासा डोह, उठती तरंग तिच्या डोळ्यात, साठली वीज वाजती मृदंग, अशा नजरेत भरून तुफान ती मिटून मिटून जाते अंधारात रंग विरून ती उरुन भास राहते".(Photo:@vanitakharat19/IG)
5/7
(Rupali Bhosle) रुपाली भोसले - रुपाली भोसलेने साकारलेले देवीचे फोटो चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहेत. रुपालीने रौद्र रूप साकारले आहे. (Photo:@rupalibhosle/IG)
6/7
(Apurva Nemlekar) अपूर्वा नेमळेकर - "रात्रीस खेळ चाले" मालिकेतून प्रेक्षकांना आपल्या नजरेने घायाळ करणाऱ्या शेवंताने नवरात्रीत देखील प्रेक्षकांना वेड लावलं. भारतातील विविध मंदिरातल्या गाभाऱ्यातील देवींची नऊ रूपं मांडण्याचा तिने प्रयत्न केला आहे.(Photo:apurvanemlekarofficial/IG)
7/7
(Vishakha Subhedar) विशाखा सुभेदार - यंदाच्या नवरात्रीत विशाखाने नारीशक्तीचे दर्शन घडवले आहे. 'लल्लाटी भंडार' गाण्यावर विशाखा सुभेदारने केलेला जोगवा सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.(photo : @subhedarvishakha/IG)
Sponsored Links by Taboola