Marathi Actor and Producers: 'हे' मराठी कलाकार करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण

मराठी कलाकार-निर्माते

1/5
Prasad Oak : याआधी प्रसाद ओक विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. अभिनेता, दिग्दर्शन करत असताना त्याने निर्मितीसंस्था सुरू करावी अशी मागणी त्याच्या मित्रांनी केली होती. त्यांच्या या मागणीला त्याची पत्नी मंजिरी हिने पाठींबा दिला. त्यानंतर त्याने अभिनय प्रवास सुरू ठेवला आणि मंजिरीने संसाराचा गाडा सांभाळला. पण दोघांनी मिळून एकत्र काम करावे या विचारातून त्यांनी निर्मितीसंस्था सुरू केली आहे. (Photo:@theprasadoak/FB)
2/5
Kshiti jog : अभिनय करत असताना निर्मिती व्यवसायात उतरावं अशी क्षितीची इच्छा होती. पण धाडस होत नव्हते. "झिम्मा" चित्रपटासाठी निर्मिती करण्याची इच्छा झाली त्यामुळे तिने तो व्यवसाय स्वीकारला. या व्यवसायात ती नवीन आहे. त्यामुळे निर्मिती व्यवसायातील बारकाव्यांचा अभ्यास करणे तिचे सुरू आहे. (Photo:@JogKshitee/FB)
3/5
Sonali Kulkarni : सोनाली महाविद्यालयात मास मीडियाचे शिक्षण घेत असतानाच निर्मिती व्यवसाय करण्याचा विचार करत होती. ती अनेक चित्रपटांत अभिनय करत असली तरी त्या दरम्यान तिने चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम केले आहे. त्यात 'हंपी' पासून 'हिरकणी' पर्यंतच्या चित्रपटांचा समावेश आहे. (Photo:@sonalee1/FB)
4/5
Digpal Lanjekar : या आधी दिग्पाल निर्माता सहाय्यक म्हणून दिसून आलेला आहे. त्यामुळेच त्याने कमी बजेटमध्ये भव्य चित्रपट बनवले आहेत. नाविन्यपूर्ण कल्पना स्वतंत्रपणे मांडता येतात. सध्या चिन्मय मांडलेकर सोबत 'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेची निर्मिती करताना दिग्पाल दिसून येतो आहे. (Photo:Digpal Lanjekar/FB)
5/5
Abhijit Guru : मालिकालेखन करताना अभिजित अनेक वाहिन्यांच्या संपर्कात होता. लिखाणासोबत अनेक गोष्टींची सांगड घालत प्रेक्षकांना चांगले सादरीकरण कसे देता येईल याचा विचार करत अभिजितने निर्मिती व्यवसायात पदार्पण केले आहे. आता अभिजित मालिका लेखनासोबत मालिकांची निर्मितीदेखील करणार आहे. त्यामुळे त्याची जबाबदारीदेखील वाढली आहे.(Photo:@abhijt.guru/FB)
Sponsored Links by Taboola