महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील 'हे' विनोदवीर करत आहेत प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन
फोटो - सोशल मीडिया
1/5
पंढरीनाथ कांबळी आणि निर्मीती सावंत या जोडीने नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरीनाथ कांबळीने इंडस्ट्रीमध्ये 'पॅडी' म्हणून त्याची ओळख निर्माण केली आहे. आजही तो घराघरात 'पॅडी' म्हणूनच ओळखला जातो.
2/5
समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार ही जोडी नेहमीच धुमाकूळ घालत असते. त्यांचे चाहते देखील त्यांचं नेहमीच भरभरून कौतुक करत असतात. महाराष्ट्रच्या हास्य जत्रेच्या माध्यमातून तो दोघेही आज घराघरात प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करत आहेत.
3/5
वनिताने छोटा पडदा गाजवल्यानंतर ती कबीरसिंग चित्रपटातून दिसली होती. तिला आता कोळीवाड्याची रेखा म्हणून नवी ओळख मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी तिने केलेल्या एका न्यूड फोटोशूटची चर्चा प्रचंड गाजली होती.
4/5
आपल्या विनोदाच्या यूनिक टायमिंगमुळे प्रसाद खांडेकर नेहमीच चर्चेत असतो. निखळ विनोद करत असल्याने त्याने विनोद नेहमीच प्रेक्षकांना भावत असतात.
5/5
नम्रता आवटे-संभेराव ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा गाजवल्यानंतर ती आता महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिचे आणि तिच्या छोट्या मुलाचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या चाहत्यांचा देखील त्यावर चांगला प्रतिसाद मिळत असतो.
Published at : 25 Sep 2021 04:48 PM (IST)