Madhurani Prabhulkar: मधुराणी प्रभुलकर यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाल्या, 'आपल्या माणसांची काळजी...'
आई कुठे काय करते मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात.
(Madhurani Prabhulkar/instagram)
1/8
आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
2/8
आई कुठे काय करते मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात.
3/8
नुकतीच मधुराणी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
4/8
मधुराणी यांनी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन मधुराणी यांनी चाहत्यांना काही टीप्स दिल्या आहेत.
5/8
फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'मित्र मैत्रिणींनो, प्रचंड उन्हाळा आहे ... आणि त्यातही घराबाहेर पडून आपली कामं करत राहणं तर भाग आहे. अशावेळी ताक, नारळपाणी , सरबत पीत राहून आपली काळजी घ्यायची. तुम्हीही स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घेत रहा'
6/8
मधुराणी या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ त्या शेअर करतात.
7/8
मधुराणी या त्यांच्या मुलीसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करतात.
8/8
इन्स्टाग्रामवर त्यांना 241K फॉलोवर्स आहेत. इन्स्टाग्रामवरील त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
Published at : 19 Apr 2023 04:31 PM (IST)