Kapil Sharma : कॉमेडी स्टार कपिल शर्मावर स्वत:च्याच लग्नातून पळून जाण्याची वेळ; नक्की काय घडलं?
Kapil Sharma Funny Story : कॉमेडी किंग कपिल शर्मा लग्नमंडपातून पळून गेला होता. ही रंजक कहाणी सविस्तर वाचा.
Kapil Sharma
1/10
कॉमेडीने सगळ्यांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा लाखो-कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
2/10
कपिल शर्माने त्याच्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर 'कॉमेडी किंग'चा टॅग मिळवला आहे. त्याची फॅन फॉलोइंग एखाद्या बॉलिवूड स्टार्सपेक्षाही जास्त आहे.
3/10
आज कपिल शर्माच्या लग्नाशी संबंधित एक मजेदार किस्सा जाणून घ्या, जो तुम्ही यापूर्वी कधीच ऐकला नसेल.
4/10
कपिलने 'द कपिल शर्मा' शोमध्ये जेव्हा ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर त्यांच्या शोमध्ये आले होते, तेव्हा ही कहाणी शेअर केली होती.
5/10
राज बब्बर यांचा एक प्रसंग ऐकल्यानंतर कपिल शर्माने सांगितलं होतं की, तोही त्याच्या लग्नातून पळून गेला होता.
6/10
कपिलनं सांगितलं की, ज्या दिवशी त्याचं लग्न होतं त्या दिवशी तो स्टेजवर बसला होता. यावेळी त्यांना स्टेजवर अनेकांनी गर्दी केली होती आणि एवढ्या लोकांच्या वजनामुळे स्टेज तुटू शकतो या विचाराने तो खूप घाबरला होता.
7/10
कपिल शर्माने पुढे सांगितलं की, त्यावेळी तो इतका घाबरला की तो त्याच्या लग्नात स्टेज सोडून खोलीत पळून गेला आणि बराच वेळ खोलीतून बाहेर आला नाही.
8/10
त्यानंतर सर्वजण स्टेजवरून खाली उतरले तेव्हा कपिल खोलीतून बाहेर आला आणि त्यानंतर गिन्नी आणि त्याच्या लग्नाचे विधी पार पडले.
9/10
कपिल शर्माचा हा किस्सा ऐकून राज बब्बरसह प्रेक्षकही जोरजोरात हसू लागले.
10/10
कपिल शर्माने 2018 मध्ये गिन्नी चतरथसोबत लग्न केलं. आता कपिल आणि गिन्नीला एक गोंडस मुलगी आणि एका मुलगा आहेत. कपिल अनेकदा मुलांचे फोटो सोशल मीडियावरवर शेअर करतो.
Published at : 18 Sep 2023 12:03 AM (IST)