PHOTO : लडिवाळ बटा, गुलजार छटा... ‘अंतरा’चा चंद्रा लूक सोशल मीडियावर चर्चेत!
मंगळागौरीच्या निमित्ताने अंतर म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने सुंदर निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती.
Yogita Chavan
1/8
छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील अंतरा-मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
2/8
या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण हिने ‘अंतरा’ हे पात्र साकारले आहे.
3/8
‘जीव माझा गुंतला...’ या मालिकेची सध्या छोट्या पडद्यावर हवा आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
4/8
सध्या सगळीकडे मंगळागौर साजरी करण्याची तयारी सुरु आहे. यातच मराठी मालिका देखील सामील झाल्या आहेत.
5/8
मराठी मालिकांमध्ये देखील सध्या मंगळागौरचा माहोल पाहायला मिळत आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत यंदा अंतराची पहिली मंगळागौर साजरी केली गेली आहे.
6/8
याच निमित्ताने अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण हिने सुंदर निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती.
7/8
योगिता चव्हाण हिने तिचे सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
8/8
या फोटोशूटमध्ये ती पारंपारिक वेशात दिसत आहे. नऊवारी साडी आणि दागिन्यांमध्ये योगिता खूप सुंदर दिसत आहे. (Photo : @official_chavan_yogita/IG)
Published at : 03 Sep 2022 09:31 AM (IST)