'मन उडू उडू झालं' मालिकेतील 'इंद्रा आणि दिपू'ने घेतली 'राज ठाकरें'ची भेट
मन उडू उडू झालं
1/6
'मन उडू उडू झालं' मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. मालिकेतील 'इंद्रा आणि दिपू'ची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगली भावत आहे.
2/6
इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली आहे.
3/6
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या दीपोत्सवात ऋता आणि अंजिक्यने हजेरी लावली होती.
4/6
राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा अनुभव खूपच अविस्मरणीय असल्याची भावना ऋता आणि अंजिक्यने व्यक्त केली.
5/6
अजिंक्य राऊत म्हणाला,"मन उडू उडू झालं ही मालिका आणि त्यातील माझ्या व्यक्तिरेखेवर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेम करत आहेत. त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहोत. म्हणूनच आम्हाला दीपोत्सवाच्या सोहळ्याला येण्याचा बहुमान मिळाला".
6/6
"माननीय राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि त्यांना भेटून मला खूप छान वाटलं. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता", असं ऋता म्हणाली.
Published at : 02 Nov 2021 09:59 PM (IST)