PHOTO : गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली... हृता दुर्गुळेने शेअर केले रिसेप्शनचे खास फोटो!
hruta durgule
1/6
‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळे (Hruta Durgule) नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सध्या हृता 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zal) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचत आहे. हृताला फुलपाखरू मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
2/6
हृता 18 मे 2022 रोजी प्रतीक शाहसोबत (Prateek Shah) लग्नबंधनात अडकली आहे. हृता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबत 24 डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती.
3/6
नुकतेच हृताने तिच्या लग्नाचे आणि रिसेप्शन सोहळ्याचे फोटो सोशल मीडिया शेअर केले आहेत. या फोटोत हृता आणि प्रतिक एकमेकांमध्ये हरवलेले पाहायला मिळाले.
4/6
प्रतीक हा अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. हृताची 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
5/6
तर, 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीक शाहने केलं आहे. हृताचा 'अनन्या' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
6/6
या सिनेमाचे दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. तर 'दादा एक गुड न्यूज आहे' या हृताच्या नाटकाचे सध्या रंगभूमीवर जोरदार प्रयोग होत आहेत. सोशल मीडियावर हृताचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo : @ hruta12/IG)
Published at : 22 May 2022 09:48 AM (IST)