Happy Birthday Urfi Javed : उर्फी जावेदचा 25वा वाढदिवस! हटके फॅशन स्टाईलमुळे नेहमीच राहिलीये चर्चेत
मॉडेल-अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. हटके फॅशन आणि विचित्र कपड्यांमुळे ती नेहमीच प्रसिद्धी झोतात असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउर्फीने प्रत्येक वेळी तिच्या फॅशन सेन्सने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. तिच्या विचित्र कपड्यांमुळे तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.
फॅशनशिवाय इतर विषयांमुळेही उर्फी जावेद अनेकवेळा वादाचा भाग ठरली आहे.
उर्फी आज तिचा 25वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावरही उर्फीचा जलवा पाहायला मिळतो.
उर्फीचा जन्म लखनौमध्ये झाला. तिचे संपूर्ण शिक्षणही लखनौमध्येच झाले. उर्फीला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. शिक्षण पूर्ण करून ती स्वप्ननगरी मुंबईत आली.
2016मध्ये उर्फीने 'बडे भैया की दुल्हनिया' या मालिकेद्वारे टेलिव्हिजन विश्वामध्ये पदार्पण केले. यानंतर ती एकापाठोपाठ एक अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसाली.
2017मध्ये उर्फी 'मेरी दुर्गा' या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता पारस कलनावतही महत्त्वाच्या भूमिकेत होता.
या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि दोघेही एकमेकांना डेट करू लागले. पण लवकरच दोघांचे ब्रेकअप झाले होते. यानंतर ती ‘बिग बॉस ओटीटी’मध्येही झळकली. (Photo : @urf7i/IG)