PHOTO : आमिर खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण, आता ‘कपिल शर्मा शो’ गाजवतेय सुमोना चक्रवर्ती!
Sumona Chakravarti
1/6
'द कपिल शर्मा शो'मध्ये ‘भुरी’ची भूमिका करणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) आज (24 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहे. सुमोनाने वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
2/6
'द कपिल शर्मा शो'मध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती आज 34 वर्षांची झाली आहे. सुमोना गेल्या अनेक वर्षांपासून कपिलच्या शोचा एक भाग आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये येण्यापूर्वी आपण सुमोनाला अनेक रिअॅलिटी शोमध्ये पाहिले आहे.
3/6
1999मध्ये आलेल्या आमिर खान आणि मनीषा कोईराला स्टारर 'मन' या चित्रपटातून सुमोना चक्रवर्तीने अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात सुमोनाने नेहा नावाच्या शालेय विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती.
4/6
मात्र, यानंतर ती मालिकांकडे वळली. तिने अनेक मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका केल्या. पण तिला खरी ओळख ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेमुळे मिळाली.
5/6
सुमोना चक्रवर्तीचा पडद्यावरचा आतापर्यंतचा प्रवास खूपच रंजक राहिला आहे. 'बडे अच्छे लगते हैं' या टीव्ही मालिकेनंतर सुमोनाने सोनी टीव्हीच्या 'कहानी कॉमेडी सर्कस की' या कॉमेडी शोमध्ये कपिल शर्मासोबत भाग घेतला होता. या शानदार केमिस्ट्री आणि कॉमेडी टायमिंगमुळे कपिल आणि सुमोना यांनी हा शो जिंकला.
6/6
त्यानंतर जून 2013 ते 2017 या काळात हे दोघे 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये पुन्हा एकत्र दिसले. यानंतर कपिल शर्माने पुन्हा सोनी टीव्हीवर 'द कपिल शर्मा शो' नावाचा नवीन शो सुरू केला, ज्यामध्ये सुमोनाने ‘सरला गुलाटी’ची भूमिका साकारली होती. (Photo : @ sumonachakravarti/IG)
Published at : 24 Jun 2022 08:52 AM (IST)