Happy Birthday Rubina Dilaik : ‘बिग बॉस’ फेम रुबिनाला अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम!
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक आज (26 ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. रुबिनाने 2006 मध्ये ‘मिस शिमला’ स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा जिंकली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुबिनाला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती, त्यामुळे तिने 'छोटी बहू' या टीव्ही मालिकेद्वारे मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले.
रुबिना दिलैकने 2008 मध्ये टीव्ही सीरियल ‘छोटी बहू’मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, तिला कधीच अभिनय क्षेत्रात काम करायचं नव्हतं.
रुबिनाला आयएएस व्हायचं होतं आणि त्यासाठी ती तयारी करत होती. पण, याच दरम्यान ऑडिशनमध्ये तिची निवड झाली. या टेलिव्हिजन सीरियलमध्ये ती राधिकाच्या भूमिकेत दिसली होती.
'छोटी बहू' मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे रुबिना घराघरात प्रसिद्ध झाली. 2012 मध्ये, तिने सोनी टेलिव्हिजनच्या सास बिना ससुरालमध्ये ही मुख्य भूमिका साकारली होती.
रुबिनाने कलर्स टीव्हीवरील ‘शक्ती-अस्तित्व के एहसास की’मध्ये ‘सौम्या सिंह’ या ट्रान्सजेंडर महिलेची भूमिका केली होती. यासाठी तिचे खूप कौतुक झाले.
यानंतर रुबिनाने पती अभिनव शुक्लासोबत ‘बिग बॉस’च्या 14व्या सीझनमध्ये भाग घेतला होता. या सीझनची ती विजेती ठरली. रुबिना तिच्या स्टाईल आणि फॅशनमुळे सोशल मीडियावरही चर्चेत असते. (Photo : Rubina Dilaik/IG)