Happy Birthday Prajaktta Mali : बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, मालिकाच नाही तर चित्रपटातूनही प्राजक्ता माळी करतेय प्रेक्षकांचं मनोरंजन!
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali ) हिचा आज (8 ऑगस्ट) वाढदिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी नाटकं, मालिका, चित्रपट आणि आता वेब सीरिज या चारही माध्यमातून प्राजक्ता प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत असते.
प्राजक्ता माळीने ललित कला केंद्रातून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. सुरुवातीला तिने काही बालनाट्यांमधूनही काम केले होते.
वयाच्या 7व्या वर्षी प्राजक्ताने भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाकडून तिने भरतनाट्यमच्या सर्व परीक्षांमध्ये प्रथम स्थान मिळवले होते.
प्राजक्ता माळीने मराठीसोबत हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली भाषेत देखील अभिनय केला आहे. ‘तांदळा’ या चित्रपटात तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती.
‘जुळून येती रेशीम गाठी’ या मालिकेतील ‘मेघना’ या भूमिकेने तिला घराघरांत प्रसिद्धी मिळवून दिली होती. ‘हम्पी’, ‘खो-खो’, ‘पांडू’ आणि नुकत्याच आलेल्या ‘रानबाजार’मधून तिचे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. (Photo : @ Prajaktta Mali/IG)