Happy Birthday Mukta Barve : नाटक, मालिका आणि चित्रपट, तिन्ही विश्वात अभिनयाचा जलवा दाखवणारी अभिनेत्री मुक्त बर्वे!

Mukta Barve

1/6
आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.
2/6
मुक्ताचा जन्म पुण्यात पिंपरी चिंचवड येथे 17 मे 1979 रोजी झाला. एका मध्यामवर्गीय कुटुंबात तिचं बालपण गेलं. मुक्ताचे वडील टेलिकॉम कंपनीमध्ये नोकरी करायचे, तर तिची आई शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. मुक्ताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
3/6
शाळेत असतानाही मुक्ता अनेक नाटकांमध्ये सहभागी व्हायची. आपण पुढे मनोरंजन विश्वातच करिअर करायचं असं तिने ठरवलं होतं. मुक्ताची आई छान छान नाटकं देखील लिहायची. तिच्यामुळेच मुक्ताला अभिनयाची, कलेची आवड निर्माण झाली होती.
4/6
मुक्ताने नाटकांमधूनच आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘घर तिघांचं असावं’ या नाटकातून तिने रंगभूमीवर पदार्पण केले होते. ‘घडलंय बिघडलंय’ या मालिकेतून तिने मालिका विश्वात पदार्पण केले होते. मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात मुक्ता सक्रिय आहे.
5/6
‘थांग’, ‘सावर रे’, ‘माती माय’, ‘एक डाव धोबी पछाड’, ‘बदाम राणी गुलाम चोर’, ‘ऐका दाजीबा’, ‘हायवे’, ‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘जोगवा’, ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मुंबई पुणे मुंबई 2’, ‘मुंबई पुणे मुंबई 3’. ‘डबल सिट’, स्माईल प्लीज’ असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट मुक्ताने दिले आहेत.
6/6
मुक्ताने एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मुक्ताला तिच्या अभिनयासाठी अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत. ‘जोगवा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि यातील मुक्ताच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक झाले. (Photo : @muktabarve/IG)
Sponsored Links by Taboola