Happy Birthday Dilip Joshi : बेरोजगार ते कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक; जाणून घ्या 'जेठालाल' उर्फ दिलीप जोशी यांच्या संपत्तीबद्दल
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून दिलीप जोशी घराघरांत पोहोचले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका मिळण्याआधी जवळपास एक वर्ष दिलीप जोशी बेरोजगार होते.
काम मिळत नसल्याने दिलीप जोशी यांनी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता.
दिलीप जोशीचे नाव आज टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सामील आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार दिलीप जोशी यांची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे.
दिलीप जोशी एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये मानधन घेतात.
दिलीप जोशी यांनी 'मैने प्यार किया', 'वन 2 का 4', 'ढूंढते रह जाओगे', 'वॉट्स योर राशि', 'खिलाड़ी 420', 'हमराज' आणि 'फिराक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
'दो और दो पांच', 'हम सब बाराती', 'कोरा कागज' आणि 'दाल में काला' या मालिकांमध्येही दिलीप जोशी यांनी काम केलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जेठालालच्या भूमिकेच्या माध्यमातून दिलीप जोशी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
दिलीप जोशी यांचा अभिनय आणि विनोदाचं टायमिंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.