Gautami Deshpande And Swanand Tendulkar: शुभमंगल सावधान!गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांचा विवाह सोहळा संपन्न

अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आणि स्वानंद तेंडुलकर (Swanand Tendulkar) यांचा विवाह सोहळा पार पडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गौतमी आणि स्वानंद यांच्या विवाह सोहळ्याला त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी आणि कुटुंबानी हजेरी लावली होती.

गौतमी आणि स्वानंदने त्यांच्या विवाह सोहळ्यासाठी खास लूक देखील केला होता.
गुलाबी रंगाची साडी, नाकात नथ आणि गोल्डन ज्वेलरी असा लूक गौतमीनं विवाह सोहळ्यासाठी केला होता.
गौतमी आणि स्वानंद यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, Did I hear beautiful? To the Beginnings
गौतमी आणि स्वानंद यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये गौतमीची बहीण मृण्मयी देशपांडे ही स्वानंदचे कान पिळताना दिसत आहे.
गौतमी आणि स्वानंद यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्यांच्या लग्नसोहळ्याच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
गौतमी आणि स्वानंद यांचा हळद आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.