Bigg Boss Marathi 3: मराठी बिग बॉसचं घर आणि स्पर्धक कसे आहेत? जाणून घ्या
बिग बॉस मराठीचा सीझन 3 (Bigg Boss Marathi Season 3) कलर्स मराठी टीव्हीवर सुरू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) पुन्हा एकदा हा रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहेत.
बिग बॉस मराठीतील प्रत्येक बिग बॉस प्रमाणे, मनोरंजन क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी 100 दिवसांपेक्षा जास्त काळ बिग बॉसच्या घरात बंद राहतील. शोचा प्रीमियर 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर आला होता.
संपूर्ण आठवडाभर प्रसारित होण्याव्यतिरिक्त, दर्शकांना बिग बॉस मराठी 24X7 पाहण्याची संधी वूटवर लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे (Live Streaming On Voot) देखील मिळणार आहे.
या हंगामात, मतदानासह, दर्शकांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना 'तुमचा प्रश्न'द्वारे काही प्रश्न विचारण्याची आणि त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना 'चुगली बूथ'द्वारे संदेश पाठवण्याची संधी दिली जाईल.
प्रेक्षक 'व्हिडीओ विहार'द्वारे इतर चाहत्यांसोबत त्यांची मते मांडू शकतात.
अलीकडेच महेश मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यांना रक्ताचा कर्करोग होता. या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी बिग बॉस मराठीसाठी प्रोमो शूट केला.
याबद्दल बोलताना ते म्हणाले, “गेली दीड वर्षे आपल्या सर्वांसाठी खूप कठीण होती. आपण सर्व भावनिक रोलर कोस्टर राइडमधून गेलो आहोत.
पण महाराष्ट्राचा सर्वात आवडता शो बिग बॉस मराठीच्या आगमनाने, आम्हाला आशा आहे की प्रेक्षक त्यांच्या वेदना आणि दु:ख विसरतील.
यावेळच्या शोमधील स्पर्धक : सोनाली पाटील, विशाल कदम, स्नेहा वाघ, गायत्री दातार, विकास पाटील, सुरेखा कुडची, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, मीरा जगन्नाथ, तृप्ती देसाई, अविष्कार दारव्हेकर, शिवलीला पाटील, मिनल शाहा, संतोष चौधरी आणि अक्षय वाघमारे.
यावेळची मराठी बिग बॉसचं घर कसं आहे? पहा..
यावेळी अनेक नवीन गोष्टी करण्यात आल्या आहेत.
यावेळी स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस दिसत आहे.
यामुळे प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन होणार आहे.
यावेळी कोण जिंकणार हे येणारा काळच सांगेल..