Photo : दिव्यांका त्रिपाठी पतीसोबत मालदीवला रवाना, निळ्याशार समुद्र किनाऱ्यावर दाखवला रोमँटिक अंदाज!

Divyanka Tripathi, Vivek Dahiya

1/6
टीव्ही विश्वाची लाडकी जोडी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया हे सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहेत. दोघांनी नुकताच लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला. आता या जोडप्याने त्यांच्या सुट्टीतील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहते लाईक्सचा पाऊस पडत आहेत.
2/6
दिव्यांका त्रिपाठीनेही मालदीव ट्रीपमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात तिची स्टाईल कमाल दिसत होती. तिचे हे फोटो पाहून चाहतेही कौतुक करताना थकत नाहीयत.
3/6
या फोटोंमध्ये अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली, ज्यामध्ये तिची स्टाइल खूप सुंदर दिसत होती. फोटोंमधील अभिनेत्रीचा लूक पाहून चाहत्यांचीही नजर तिच्यावर खिळली होती.
4/6
9 जुलै 2022 रोजी विवेक आणि दिव्यांकाने त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला. यावेळी दोघांनीही फोटो शेअर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
5/6
या कपलचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत, ज्यामध्ये दोघे पूलमध्ये धमाल करताना दिसत आहेत. फोटोंमध्ये दिव्यांका नाश्त्याचा आस्वाद घेत असल्याचे दिसत आहे.
6/6
टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लवकरच सलमान खानच्या शो 'बिग बॉस 16'मध्ये दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या शोसाठी अभिनेत्रीला विचारण्यात आले आहे. दिव्यांकाने मात्र अद्याप याबाबत काहीही सांगितलेले नाही. (Photo : @Divyanka Tripathi/IG)
Sponsored Links by Taboola