Dhanashri Kadgaonkar : "कुरररररररर... बाळाचं बारसं झालं... नाव ठेवलं..." ; वहिनीसाहेबांनी शेअर केले बारशाचे फोटो

(Photo : @kadgaonkar_dhanashri instagram)

1/7
'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने आपल्या बाळाच्या बारशाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
2/7
काही दिवसांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाल्याची माहिती धनश्रीनं सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली होती. तेव्हापासूनच चाहते धनश्रीच्या बाळाची झलक पाहण्यासाठी आतूर झाले होते. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
3/7
अखेर धनश्रीनं आपल्या बाळाच्या बारशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
4/7
"बाळाचं बारसं झालं... नाव ठेवलं "कबीर" कुररररररररररररर...." , अशा कॅप्शनसह धनश्रीनं फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
5/7
धनश्रीनं तिची ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहते आणि तिच्या काही कलाकार मित्रांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असून तिच्या बाळाच्या फोटोंवर हार्ट इमोजीसह रिअॅक्शन दिली आहे. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
6/7
धनश्रीने यापूर्वी 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' , 'गंध फुलांचा गेला सांगून' या मालिकांमध्येही काम केले आहे. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
7/7
अभिनेत्री धनश्री काडगावकर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून प्रसिद्धिझोतात आली. या मालिकेत धनश्रीने साकारलेली नंदिता गायकवाड ही भूमिका वहिनीसाहेब याच नावाने संबंध महाराष्ट्र भरात गाजली. मातृत्त्वाची चाहूल लागल्यानंतर धनश्रीनं प्रचंड गाजलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील 'वहिनीसाहेब' या पात्राला रामराम ठोकला होता. (Photo : instagram @kadgaonkar_dhanashri)
Sponsored Links by Taboola