Thipkyanchi Rangoli : अपूर्वा आणि शशांकच्या केळवणाला दीपानं लावली हजेरी

thipkyanchi rangoli

1/7
सध्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांक आणि अपूर्वाच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.
2/7
संपूर्ण कानेटकर आणि वर्तक कुटुंब या लग्नासाठी उत्सुक असून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
3/7
शशांक आणि अपूर्वाच्या केळवणाला रंग माझा वेगळा मालिकेतील दीपाने हजेरी लावली आहे.
4/7
शशांक आणि अपूर्वाच्या केळवणासाठी सध्या जय्यत तयारी सुरु असून केळवणासाठी पाहुणी म्हणून हजेरी लावणार आहे
5/7
जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा.
6/7
दोघांचं केळवणही हटके असणार हे वेगळं सांगायला नको. त्यामुळेच या दोघांच्या केळवणात आनंदाचे रंग भरण्यासाठी दीपा खास हजेरी लावणार आहे.
7/7
सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, ज्ञानदा रामतीर्थकर आणि चेतन वडनेरे हे कलाकार ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतात.
Sponsored Links by Taboola