बिग बॉस विजेती Megha Dhade ने सोशल मीडियावर शेअर केले क्लासी फोटो
मेघा धाडे बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. त्यानिमित्ताने बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील सदस्यांना काही सल्ले द्याला मेघा यंदाच्या बिग बॉसच्या घरात गेली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिग बॉसच्या घरात मेघाने काळ्या रंगाचा क्लासी वनपीस घातला होता. त्यावर मेघाने गडद लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. त्यामुळे फोटोंत बोल्डनेस दिसून येतो.
बिग बॉसच्या घरात मेघा प्रत्येक सदस्यावर हक्क गाजवायची, इतरांना स्वत:पेक्षा कमी लेखणं, गॉसिप करणं यामुळे ती निशाण्यावर होती. 'मेघाला सगळं येतं', 'मेघाला सगळं माहिती आहे' असे टोमणेदेखील तिला मारले जायचे.
मान सन्मान, सुपरस्टार, एक होती राणी अशा सिनेमांत मेघा दिसून आली होती.
मेघाने मराठी मनोरंजनसृष्टीसोबत हिंदी मालिकांमध्येदेखील काम केलं आहे.
बिग बॉसच्या पर्वाची विजेती झाल्यानंतर मेघाचा चाहतावर्ग दुप्पट झाला आहे. मेघा सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह असते.