Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात 'पार्किंगचा किंग' ठरवणार कॅप्टन

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात पार्किंगचा किंग हे कॅप्टनसी कार्य रंगणार आहे.

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात आज ठरणार 'पार्किंगचा किंग'

1/11
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
2/11
या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे.
3/11
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार्किंगचा किंग हे कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे.
4/11
या टास्कमध्ये कोण विजयी होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.
5/11
कॅप्टन पदासाठी रोहित आणि अक्षय हे दोन उमेदवार मिळाले. आज या दोघांमध्ये कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे.
6/11
कोण बनणार घराचा नवा कॅप्टन? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
7/11
टास्क म्हटलं की भांडणं, मारामारी, हे आलंच. आज हे कार्य सदस्य कसे पार पाडतील हे आजच्या, गुरुवारच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे.
8/11
सोशल मीडियावर पार्किंगचा किंग या कॅप्टन्सी कार्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
9/11
या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
10/11
एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आज येणार खरे चेहरे समोर अक्षय,अपूर्वा ,रुचिरा, रोहित तुमचे मैत्रीचे मुखवटे आज फाटताना दिसतील सर्वांना' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'मला वाटतं अक्षय कॅप्टन होऊ नये.'
11/11
बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनची पहिली कॅप्टन समृद्धी जाधव ठरली होती.
Sponsored Links by Taboola