Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या फिनालेत 'या' सदस्यांची एन्ट्री; कोण मारणार बाजी?
बिग बॉस मराठी सीझन 4 ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. या सीझनचा फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्पर्धेच्या अंतिम टप्प्यात आता केवळ सात स्पर्धक बाकी राहिले आहेत. या सातही स्पर्धकांमध्ये दिवसेंदिवस चुरशीची लढत पाहायला मिळतेय.
मराठी अभिनेते किरण माने हे बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वात वयाने मोठे असलेले सदस्य. मात्र, बिग बॉसच्या शर्यतीत किरण माने यांनी देखील चांगलाच दबदबा निर्माण केला आहे.
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकरने बिग बॉसच्या घरात देखील आपली जादू कायम ठेवली आहे.
अनेक मराठी नाटक, मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अक्षय केळकर हा देखील बिग बॉसच्या फिनालेमध्ये पोहोचला आहे. त्याचा खेळण्यातला अॅटीट्यूड अनेकांना आवडतो.
'मिसेस मुख्यमंत्री' फेम कोल्हापूरच्या मिरचीचा तडका अमृता धोंगडेदेखील टॉप 7 स्पर्धकांपैकी आहे. अनेकदा तिचा खेळ प्रेक्षकांना पाहायला आवडतो.
बिग बॉस मराठीच्या फिनालेच्या शर्यतीत अभिनेता प्रसाद जवादेचंही नाव पुढे आहे. प्रसादच्या शांत आणि निरागस वागण्यामुळे अनेकदा त्याला प्रेक्षकांकडून पसंती मिळते.
यंदाच्या बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेला आरोह वेलणकरदेखील आपल्या स्मार्ट मूव्ह ने फिनालेपर्यंत पोहोचला आहे.आरोहचं शांत आणि संयमी वागणं तसेच समजूतदारीने निर्णय घेणं चाहत्यांना फार आवडतंय.
खरंतर, यंदाच्या बिग बॉसला राखी सावंतच्या येण्याने चार चॉंद लागले. वेळीच आपल्या नखरेल अंदाजाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी राखी अनेकदा राग अनावर झाल्यावर रौद्र रूपही धारण करते हे बिग बॉसच्या चाहत्यांनी पाहिलं आहे.
यंदाच्या बिग बॉस मराठीच्या घराची थीम देखील बाल्कनी आणि चाळ संस्कृतीवर आधारित आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असा सेट तयार करण्यात आला आहे.