Who is Orry: आलिया भट्टपासून ते जान्हवी कपूरचा आवडता ओरी पूर्वी करायचा वेटरचं काम; मग 'असं' बदललं आयुष्य
Orry aka Orhan Awtarmani: सिनेतारकांचा आवडता ओरी याने अलीकडेच बिग बॉस 17 मध्ये प्रवेश केला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, एवढा प्रसिद्ध होण्यापूर्वी ओरी वेटर म्हणून काम करायचा?
Who is Orry?
1/11
बॉलीवूड सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमध्ये चमकणारी व्यक्ती ओरहान अवतारमणी उर्फ ओरी याने नुकताच 'बिग बॉस 17' मध्ये प्रवेश केला आहे.
2/11
फिल्म इंडस्ट्रीतील नसूनही ओरी नेहमीच चर्चेत असतो. ओरहान अवतारमणी बी-टाऊनमध्ये खूप लोकप्रिय आहे.
3/11
ओरी अनेकदा बॉलिवूडच्या मोठ्या सेलिब्रिटींसोबत पार्टी करताना दिसतो.
4/11
न्यासा देवगनपासून ते जान्हवी कपूरपर्यंत सगळेजण ओरीला आपला चांगला मित्र मानतात.
5/11
ओरीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, जे नीता अंबानीपासून दीपिका पदुकोणपर्यंत सर्वांसोबत क्लिक केलेले आहेत.
6/11
सिनेतारकांसह ओरीचे फॅन फॉलोइंगही प्रचंड आहे.
7/11
बिग बॉस 17 मध्ये आल्यानंतर सलमान खानने त्याला विचारलं की, तो नेमकं काय काम करतो? ज्यावर ओरीने उत्तर दिलं की, तो स्वतःवर खूप काम करतो.
8/11
आता बिग बॉस 17 च्या घरात प्रवेश केल्यानंतर, ओरीने स्वतःबद्दल एक मोठा खुलासा केला आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
9/11
सलमान खानच्या शोमध्ये ओरीने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने सांगितलं. ओरी म्हटला, एवढी प्रसिद्धी मिळवण्याआधी त्याने खूप काम केलं होतं. एकेकाळी तो एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत असे.
10/11
आता मोठमोठ्या करोडपतींसोबत दिसणारा ओरी पूर्वी हॉटेलमध्ये वेटर्स ग्रुपसोबत टेबलही साफ करत असे.
11/11
शाहरुख खानची मुलं देखील ओरीचे चांगले मित्र आहेत.
Published at : 26 Nov 2023 07:59 PM (IST)