Bigg Boss 16: बिग बॉस- 16 मधून सुंबुल झाली आऊट; पोस्ट शेअर करत म्हणाली...

सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan) ही बिग बॉसच्या 16 व्या सिझनमधून आऊट झाली आहे. एका मुलाखतीमध्ये सुंबुलनं तिचा बिग बॉसमधील (Bigg Boss 16) प्रवास सांगितला.

(Sumbul Touqeer Khan/instagram)

1/10
शनिवार (4 फेब्रुवारी) सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan) ही बिग बॉसच्या 16 व्या सिझनमधून आऊट झाली.
2/10
एका मुलाखतीमध्ये सुंबुलनं तिचा बिग बॉसमधील प्रवास सांगितला.
3/10
मुलाखतीमध्ये सुंबुल म्हणाली, "बिग बॉस'मधील माझा प्रवास अप्रतिम होता आणि मला कधीच वाटलं नव्हतं की, मी इथपर्यंत येऊ शकेल."
4/10
सुंबुलनं बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
5/10
पोस्टच्या माध्यमातून सुंबुलनं तिच्या कुटुंबाचे, चाहत्यांचे आणि मित्रमैत्रिणींचे आभार मानले.
6/10
"हा असा प्रवास होता ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती. हा आतापर्यंतचा सर्वोत्तम अनुभव ठरला. तुमच्या मदतीशिवाय आणि माझे मित्र आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याशिवाय हे साहस शक्य झाले नसते.", असं सुंबुलनं पोस्टमध्ये लिहिलं.
7/10
पोस्टमध्ये तिनं 'हक से मंडली' असंही लिहिलंय.
8/10
मंडली या टीममध्ये सुंबुल, शिव, एससी स्टॅन, निमरीत हे स्पर्धक होते. या टीमला प्रेक्षकांची पसंती मिळत होती.
9/10
सुंबुलच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच, तिच्या या पोस्टला काही नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे.
10/10
बिग बॉस या शोमधील स्पर्धकांमध्ये वाद होत असतात. विकेंडला सलमान खान शोमध्ये येऊन बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांसोबत संवाद साधतो.
Sponsored Links by Taboola