Tejasswi Prakash : मराठी मुलीच्या गळयात 'बिग बॉस 15'च्या विजेतेपदाची माळ, तेजस्वीबद्दल 'या' खास गोष्टी माहितीयेत का?
नुकताच ‘बिग बॉस 15’चा महाअंतिम सोहळा पार पडला. सहस्पर्धकांना मात देत अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने या शोचे विजेतेपद पटकावले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रेक्षकांना आणि चाहत्यांना तेजस्वी एक अभिनेत्री म्हणूनच माहीत आहे. परंतु, ही अभिनेत्री इंजिनियरदेखील आहे, हे फार कमी लोकांना माहीत असेल.
तेजस्वी प्रकाशचा जन्म 10 जून 1992 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे झाला होता. तेजस्वी प्रकाशच्या वडिलांचे नाव प्रकाश वायंगणकर असून, ते व्यवसायाने गायक आहेत.
तेजस्वी प्रकाश हिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली आहे.
तेजस्विनीने इंजिनियर म्हणून कामाला सुरुवात केली होती. मात्र, अभिनयाच्या ओढीने ती मनोरंजनविश्वकडे वळली.
‘स्वरागिनी’, ‘खतारों के खिलाडी’, ‘बिग बॉस 15’ या टीव्ही मालिकांमध्ये ती झळकली आहे. (All PC : tejasswiprakash/IG)