Sumeet Pusavale Wedding : 'बाळूमामा' फेम अभिनेता सुमित पुसावळे अडकला लग्नाच्या बेडीत, नव्या जोडीचे फोटो पाहा
Sumeet Pusavale Wedding : बाळूमामा मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमित पुसावळे (Sumeet Pusavale) नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. बाळूमामा मालिकेत सुमित पुसावळे मुख्य भूमिका साकारत आहे.
Sumeet Pusavale Wedding
1/9
अभिनेता सुमित पुसावळे आणि मोनिका महाजन यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. 14 डिसेंबर रोजी सोलापूरमधील सांगोला येथे धूमधडाक्यात हा सोहळा पार पडणार आहे. (PC : sumeet_pusavale/instagram)
2/9
अभिनेता सुमित पुसावळेने अलिकडेच सोशल मीडियावर प्री-वेडींग शूट शेअर केलं होते. तेव्हापासून सुमित चर्चेत आला आहे. (PC : sumeet_pusavale/instagram)
3/9
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या कलर्स मराठीवरील मालिकेतून सुमित पुसावळेला प्रसिद्धी मिळाली. (PC : sumeet_pusavale/instagram)
4/9
सुमित आणि मोनिका यांचं पारंपारिक पद्धतीनं लग्न पार पडलं. दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केल आहेत. (PC : sumeet_pusavale/instagram)
5/9
या फोटोमध्ये सुमित आणि मोनिका पारंपारिक वेशामध्ये दिसत आहेत. या फोटोंमधील दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. (PC : sumeet_pusavale/instagram)
6/9
सुमित पुसावळे या आधी 'लागिर झालं जी' या मालिकेमध्ये एका छोट्या भूमिकेत झळकला होता. पण त्याला खरी प्रसिद्धी बाळूमामा या मालिकेतून मिळाली. (PC : sumeet_pusavale/instagram)
7/9
सुमित आणि मोनिका यांच्या लगीनघाईचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटो आणि व्हिडीओंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (PC : sumeet_pusavale/instagram)
8/9
सुमित पुसावळेच्या लग्नात त्याची ऑनस्क्रीन पत्नी सत्यवा म्हणजेच अभिनेत्री कोमल मोरे हिनेदेखील हजेरी लावली होती. या सोबतच 'लागिर झालं जी' मालिकेची टीमसुद्धा सुमितच्या लग्नात पोहोचली होती. (PC : sumeet_pusavale/instagram)
9/9
सुमित आणि मोनिका यांचं लग्न थाटामाटात पार पडलं. कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत दोघांचा शुभविवाह पार पडला. (PC : sumeet_pusavale/instagram)
Published at : 15 Dec 2022 08:26 AM (IST)