PHOTO : टीव्हीविश्वच नाही तर, साऊथ इंडस्ट्रीही गाजवतेय ‘बालिका वधू’ फेम अविका गौर!

Avika Gor

1/7
'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेत चिमुकल्या आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) आज (30 जून) तिचा 25वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 11 व्या वर्षी अविकाला 'बालिका वधू' मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.
2/7
या भूमिकेमुळे ती घराघरांत गाजली. आजही लोक तिला ‘आनंदी’ म्हणूनच ओळखतात. मालिकेतील त्याचा जबरदस्त अभिनय पाहून चाहत्यांना तिच्याबद्दल कौतुक वाटू लागले. लोक अविकाला आनंदी नावानेच ओळखायला लागले.
3/7
‘बालिका वधू’शिवाय ती ‘ससुराल सिमर का’ या मालिकेमध्येही दिसली होती. या मालिकेमधील तिच्या पात्राला दीपिका कक्करपेक्षा जास्त प्रशंसा मिळाली. अभिनय विश्वात सक्रिय असणारी अविका समाजातील लोकांना मदत करण्यासाठीही नेहमी पुढे सरसावते.
4/7
अविका गौरला लहान मुलांचा फॅशन ब्रँड गिनी आणि जॉनीसाठी सर्वोत्कृष्ट मॉडेलचा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याचबरोबर अविका लहानपणापासून फॅशन शोमध्ये सहभागी होत होती.
5/7
2008मध्ये अविकाने 'राजकुमार आर्यन', 'मेरी आवाज को मिल गई रोशनी', 'करम अपना अपना', 'श्श… फिर कोई है' आणि 'चलती का नाम गाडी' मध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या.
6/7
2011मध्ये तिने 'ससुराल सिमर का' या मालिकेमध्ये काम केले होते. अविकाने 'ससुराल सिमर का'मध्ये रोलीची भूमिका साकारली होती. या मालिकेत अभिनेत्रीने अवघ्या 14व्या वर्षी विवाहित महिलेची भूमिका साकारली होती.
7/7
टीव्ही जगतात आपले नाव कमावल्यानंतर अविका गौरने साऊथ इंडस्ट्रीमध्येही आपले पाऊल टाकून, अभिनय करण्यास सुरुवात केली आहे. अविका गौरने 'इक्काडिकी' आणि 'उयाला जंपला' सारख्या चित्रपटात काम करून लोकांची वाहवा मिळवली होती. (Photo : @ avikagor/IG)
Sponsored Links by Taboola